“एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्रावर ॲसिड फेकताय, अरे कुठे फेडाल हे पाप”

मुंबई : शिवसेना दसरा मेळावा होणार आहे, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. या मेळाव्यातल मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकताही सर्वांना लागून राहिली होता. अखेर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर थेट निशाणा साधला आहे. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात आज पार पडला.

प्रतिवर्षी शिवाजी पार्कवर होणार सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “आपला आवाज कोणी दाबू शकत नाही, आपला आवाज दाबणारा जन्माला यायचाय,” अशी सुरुवात करत अनेकांवर बाण डागला. तसेच मुलगी शिकली प्रगती झाली पण तिच्या हाताला काम कुठंय. तिनं काही चुकीचं काम केलं तर सत्ताधारी म्हणून त्याला जबाबदार आहे.

युवाशक्तीच्या घरात चूल पेटत नाही ते म्हणतील तुमचं राजकारण चुलीत पेटवा. आपण महाराष्ट्राला पुढं नेण्याचा प्रयत्न करतो आणि हे महाराष्ट्राला बदनाम करत आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. हे एकतर्फी प्रेमासारखं आहे. मुलीनं नाही म्हटलं म्हणून ॲसिड फेकतो त्याप्रमाणे आहे. अरे माझ्या महाराष्ट्रावर कशाला ॲसिड फेकता कुठे फेडाल हे पाप? असा सवाल खडा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा