OnePlus Mobile | भारतात लवकरच लाँच होऊ शकतो OnePlus 11 5G, जाणून घ्या फीचर्स

OnePlus Mobile | टीम महाराष्ट्र देशा: चिनी मोबाईल (Mobile) उत्पादक कंपनी वनप्लस (OnePlus) नेहमी आपल्या ग्राहकांसाठी उत्कृष्ट स्मार्टफोन लाँच करत असते. अशात वनप्लस स्मार्टफोनची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कंपनी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन वर्षाच्या सुरुवातीला लाँच करणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कंपनी आपला OnePlus 11 5G हा मोबाईल नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतीय बाजारामध्ये लाँच करू शकते. कंपनी हा स्मार्टफोन बाजारामध्ये उत्कृष्ट फीचर्ससह सादर करत आहे.

OnePlus 11 5G फीचर्स

कंपनी OnePlus 11 5G या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच AMOLED डिस्प्ले देणार आहे. हा डिस्प्ले 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या मोबाईलमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध असू शकते. ही बॅटरी 100W चार्जिंगला सपोर्ट करेल. या फोनच्या कॅमेराबद्दल जर बोलायचे झाले, तर यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध असू शकतो. यामध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, 40 मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड अँगल सेंसर आणि 32 मेगापिक्सेल टेलीफोटो सेंसर उपलब्ध असू शकतो.

किंमत

कंपनीने या फोनच्या किमतीबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, या फोनची किंमत भारतामध्ये 60,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकते. कंपनी हा मोबाईल दोन स्टोरेज पर्यायासह बाजारामध्ये सादर करू शकते. यामध्ये 12/264GB आणि 16/512GB यांचा समावेश असू शकतो.

नवीन वर्षामध्ये अनेक नवीन स्मार्टफोन लाँच होणार आहे. यामध्ये वनप्लस सोबत ओप्पो, रियल मी, मोटोरोला देखील नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहेत. त्याचबरोबर Xiaomi सुद्धा नवीन वर्षाच्या सुरुवातीला 12 सीरिज अंतर्गत तीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.