निर्यातबंदीच्या निर्णयावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी

देशभरात वाढलेल्या कांद्याच्या दरामुळे सरकारकडून दरनियंत्रणासाठी कांदादर नियंत्रणासाठी गेल्या १५ दिवसांपासून केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तरीही दर नियंत्रणात न आल्याने सरकारकडून आता निर्यातबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या परराष्ट्र व्यापार विभागाच्या महासंचालकांनी याबाबतचे परिपत्रक काढून निर्यातबंदी तत्काळ स्वरूपात रविवार (ता. २९)पासून लागू केली.

शेतकऱ्यांकडे २० ते ४० टक्के कांदा शिल्लक असतानाही कांदादर नियंत्रणासाठी होणाऱ्या प्रयत्नांविरोधात प्रतिक्रिया उमटल्या होत्या. नजीकच्या काही वर्षांत अंतिम टप्प्यातील थोडा कांदा शिल्लक असताना दरात सुधारणा होऊन शेतकऱ्यांना एकूण उत्पादन आणि विक्रीचा विचार करता वाजवी दर मिळत होता. दर नियंत्रणाच्या सरकारच्या प्रयत्नांना यामुळेच शेतकऱ्यांकडून विरोध होत असताना, केंद्राने वस्तुस्थितीचे व्यवस्थित आकलन न करता कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पूरपरिस्थितीमुळे कांदा उत्पादन घटले आहे. त्यात पावसामुळे आर्द्रता वाढल्याने साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणावर सडत असताना कांद्याचे मागणीप्रमाणे गणित कोलमडले आहे. त्यामुळे कांदादर नैसर्गिकरीत्या उंचावत असून, शासनाने त्यात कोणताही हस्तक्षेप करू नये, असा सूर कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून उमटत आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.