कॅन्सर, मधुमेहापासून संरक्षण देईल पातीचा कांदा

पातीच्या कांद्यात सल्फरयुक्त घट असतो जो आणि या आजारांना दूर ठेवण्यास मदत करतो.

चायनीज राईस, चायनीज नूडल्स, चायनीज सूप. कोणताही चायनीज पदार्थ असो, त्यात पातीचा हा आवर्जून वापरला जातो. चायनीज पदार्थांमधील महत्त्वाचा घटक असलेल्या या पातीच्या कांद्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. आपल्या नेहमीच्या कांद्यापेक्षा पातीचा कांद्याचा वास, चव थोडी सौम्य असते.

कॅन्सरचा धोका कमी होतो-पातीच्या कांद्यात Allyl sulphide हा सल्फरयुक्त घटक असतो, जो फ्री रेडिकल्सशी लढतो आणि कॅन्सर पेशींच्या वाढीला कारणीभूत ठरणाऱ्या एन्झाइमची निर्मिती थांबवतं.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते-पातीच्या कांद्यातील सल्फर या घटकामुळे शरीरात इन्सुलिनची निर्मिती योग्य प्रमाणात होते आणि मधुमेहापासून संरक्षण मिळण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते-यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असतं जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतता आणि आपल्याला अनेक इन्फेक्शनपासून संरक्षण देतं.

सर्दी, तापासापासून संरक्षण-अँटिव्हायरल आणि अँटिबॅक्टेरिअल घटक असतात जे सर्दी, ताप, पोटासंबंधी समस्या दूर ठेवतात.

पचनासाठी चांगलं -पातीच्या कांद्यात फायबर भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे पचनप्रक्रिया सुलभ राहते.

डोळे निरोगी राहतात- पातीच्या कांद्यात डोळ्यांसाठी आवश्यक असणारं व्हिटॅमिन ए असतं, ज्यामुळे दृष्टी चांगली राहते

हाडं मजबूत राहतात-पातीच्या कांद्याच्या सेवनानं हाडांना मजबूती मिळते कारण यात हाडांसाठी आवश्यक असलेलं व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के मिळतं.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.