InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

जानेवारीपासून तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजेसाठी ऑनलाइन नोंदणी

तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजेसाठी १ जानेवारी 2020 पासून भाविकांना ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. मंदिर समिती 15 डिसेंबरपासून यासंदर्भात कार्यवाही सुरू करणार आहे, असे सांगण्यात आले. तुळजाभवानी मंदिरात यापूर्वी सिंहासन पूजा कधीही करण्याची पद्धत होती. त्यानंतर सकाळी पाच, दुपारी दोन यावेळी सिंहासन पूजा करण्याचा निर्णय मंदिर समितीने चार वर्षांपूर्वी घेतला. त्यानुसार सध्याही याच पद्धतीने कार्यवाही सुरू आहे. त्याशिवाय रजिस्टर नोंदणी पद्धतही समितीने अवलंबिली होती.

या पद्धतीनुसार डिसेंबर 2019 अखेरपर्यंत सिंहासन पूजेची नोंदणी झालेली आहे. सिंहासन पूजा करणाऱ्या भाविकाचे नाव, पुजाऱ्याचे नाव आदी माहिती असलेले रजिस्टर मंदिरात आहे. मंदिरातील पुजारी भाविकांची माहिती आधारकार्ड देऊन नोंदणी करू शकत होते. आता एक जानेवारी 2020 पासून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू होणार आहे.

Loading...

दरम्यान, मंदिर समितीच्या अनेक परंपरांगत सिंहासन पूजा आहेत. त्यामध्ये अश्विन अमावास्येस गरीबनाथबुवा मठाचे तुळजाभवानी मातेस सिंहासन असते. शाकंभरी नवरात्रोत्सवात काही पुजारी कुटुंबीयांसाठी सिंहासन पूजा असतात. ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत या परंपरांगत पूजेचे नियोजन कसे असेल, याबाबात उत्सुकता आहे.

तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजेसाठी एक जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया कार्यान्वित होणार आहे. यासंदर्भात येत्या 15 डिसेंबरपासून कार्यवाही सुरू होईल. बैठकीत पुजारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना तशी तोंडी सूचना दिली आहे. अशी माहिती मंदिर समितीच्या सरव्यवस्थापिका योगिता कोल्हे यांनी दिली.

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.