‘फक्त 1 कोटी…’; चाहत्याच्या मागणीवर सोनू सूदचे हटके उत्तर

मुंबई : कोरोना काळात लोकांचा मासिहा बनलेला अभिनेता सोनू  सतत चर्चेत पाहायला मिळतो. तर सोशल मीडियावर देखील सोनू नेहमी अॅक्टिव दिसतो. सोनू सूदकडे त्याचे अनेक चाहते ट्विट करुन हटके मागण्या करत असतात, त्यांच्या या मागण्यांना तो नेहमी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा सोनूकडे असेच एक हटके ट्विट केल्याचे पाहायला आले आहे.

सोनू सूदच्या एका चाहत्याने ट्विट करत मागणी केली होती, ‘सर मला एक कोटी हवे आहेत’. चाहत्याच्या या हटके मागणीवर सोनू सूदने प्रत्युत्तर दिलं आहे. ‘फक्त एक कोटी? अजून थोडे मागितले असते’, असं सोनूू सूदने म्हटलं आहे. यामध्ये त्याने एक हसणारे इमोजी देखील ट्विटमध्ये पोस्ट केलंय.

गेल्या वर्षी लॉकडाउन पडल्यापासून सोनू नेहमी कोणाची ना कोणाची मदत करताना दिसत आहे. त्यानंतर सोनू सूद राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपुर्वी सुरू होती. मात्र त्यावर त्याने स्वतःच फुल्लस्टाॅप लावला आहे.

“सोशल मीडियावर सुरू असलेली गोष्ट असत्य आहे, मी खूप आनंदी आहे आणि मी सामान्य माणूस आहे”, असं ट्विटरच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना उत्तर दिलं होतं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा