InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पाणी जपून वापरा; संपुर्ण राज्यातील धरणात फक्त 14 टक्के पाणीसाठा शिल्लक

राज्यातील तापमानाचा पारा पुन्हा चाळीशीपार गेला असून, राज्यातील धरणसाठ्यात वेगाने घट होत असून, पुणे, कोकण, नागपूर आणि औरंगाबाद विभागातील पाणी पातळीत मोठी घट नोंदविण्यात आली आहे. राज्यात अवघा 14 टक्के पाणीसाठा असून, औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये अवघे 3 टक्के पाणी शिल्लक आहे.

राज्यातील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १ हजार ४४४ टीएमसी आहे. मंगळवार अखेरीस अमरावतीत २१.२२ टक्के, औरंगाबाद २.९२, कोकण ३४.७८, नागपूर ९.०६, नाशिक १३.७५ आणि पुणे विभागामध्ये १४.१५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी राज्यात याच कालावधीत २५.२५ टक्के पाणीसाठा होता. नागपूर विभागाचा (१२.८९ टक्के) अपवाद वगळता गेल्या वर्षी सर्वच विभागात २० टक्क्यांच्यावर पाणीसाठा होता.

विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमान तर 42 ते 46 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. गेल्या 26 दिवसांमध्ये राज्यातील उपयुक्त साठ्यात 290 अब्ज घन फुटांवरून (टीएमसी) 202.13 टीएमसीपर्यंत घट झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply