ISROकडे केवळ 288 तास शिल्लक

भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (ISRO)च्या चांद्रयान 2 मोहीमेला अद्याप अपयश आलेले नाही. चांद्रयान 2 मधील लँडर विक्रमचा संपर्क तुटल्यानंतर ISROला त्याचा शोध घेण्यात यश आले होते. आता सोमवारी लँडर विक्रमचे चंद्रावर हार्ड लँन्डिंग केल्यानंतर देखील त्याचे कोणत्याच प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे समोर आले आहे. भारतासाठीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लँडर विक्रममधील कोणत्याही पार्ट तुटले नाहीत.

आता ISROकडे पुन्हा एकदा लँडर विक्रमशी संपर्क करण्याचे आव्हान आहे. पण यासाठी देखील ISROकडे केवळ 12 दिवस आहेत. जाणून घेऊयात असे कोणते कारण आहे, ज्यामुळे चांद्रयान 2 मोहीम यशस्वी करण्यासाठी ISROकडे केवळ 288 तास शिल्लक आहेत आणि या काळात त्यांच्यासमोर कोणत्या अडचणी आहेत.

रविवारी ISROला विक्रमचे लोकेशन समजले होते. तेव्हाच ISROने काऊनडाऊन सुरू केला होता. विक्रमचे हार्ड लँन्डिंग झाल्यामुळे त्याचे नुकसान झाल्याची शंका व्यक्त केली जात होती. पण चंद्राच्या भूमीवर धडकल्यानंतर विक्रम सुरक्षित आहे. आता विक्रमशी संपर्क करण्यासाठी ISROकडे केवळ 12 दिवस आहेत. सध्या चंद्रावर लूनर डे सुरु आहे. एक लूनर डे म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवस होय. यातील 2 दिवस वाया गेले आहेत. त्यामुळे ISROकडे संपर्क करण्यासाठी केवळ 288 तास आहेत. लँडर विक्रम ज्या भागात आहे तेथे दिवस आहे. 12 दिवसानंतर हा भाग काळोखात जाईल. रात्रीच्या काळात विक्रमशी संपर्क करण्यात आणखी अडचणी येतील. आमि विक्रमशी संपर्क करण्यासाठी ISROला आणखी वाट पहावी लागेल. त्यामुळेच जर 12 दिवसात ISROचा विक्रमशी संपर्क झाला नाही तर मोहीम पूर्णपणे यशस्वी होणार नाही.

Loading...
महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.