शिवसेना-भाजपामधील युतीचे पूल नितीन गडकरीच बांधू शकतील; अब्दुल सत्तारांचे पुन्हा युतीचे संकेत

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप-शिवसेना युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी सत्तार म्हणाले होते कि, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ज्यादिवशी मने जुळविण्याचा निर्णय घेतील, त्यादिवशीच खरोखर शिवसेना आणि भाजपचे मने जुळतील. एवढेच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुढाकार घेतल्यास काहीही होऊ शकते, असे ते म्हणाले होते.

यांनतर यावर विविध माध्यमातून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या. यावर आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तर यांनी तेच वक्तव्य केले आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील पूल नितीन गडकरीच बांधू शकतात, अशी प्रतिक्रिया सत्तार यांनी सिल्लोड येथे दिली. शिवसेना आणि भाजपामधील युतीसाठीचे प्रयत्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच करू शकतील. कारण त्यांच्याकडे दोन व्यक्तींची मनं जुळवण्याची क्षमता आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

तसेच पुढे युतीचे अधिकार माझ्या हातात नाहीत; पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाशी आम्ही सहमत राहू, अशी प्रतिक्रिया देत नितीन गडकरी मागील ३० वर्षांपासून मातोश्रीवर जात-येत आहेत. गडकरी रस्त्यांवर पूल बांधू शकतात तर दोन व्यक्तींची मनंही जुळवू शकतात. त्यामुळे मी हे वक्तव्य करत आहे. मी यापूर्वीही तेच विधान केले आणि आजही तेच करत आहे, असा पुनरुच्चार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा