InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मराठा आरक्षणासाठी दिलेल्या आमदारांचे राजीनामे फक्त स्टंटबाजी

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राजीनामा दिलेल्या सहा आमदारांपैकी एकाही आमदाराचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केला नसल्याचे समोर आले आहे. राजीनामा देताना विधानसभा अध्यक्षांकडे स्वत: उपस्थित राहून विहित नमुन्यात दिलेला राजीनामा मंजूर करण्यात येतो. या सहा आमदारांनी केवळ कोऱ्या कागदावर कारणासह टाईप केलेले राजीनामे पाठविल्याने त्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नांवरून सहाजणांनी दिलेले राजीनामे केवळ स्टंटबाजी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आमदार दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन जाधव, चिकटगावकर, रमेश कदम, भारत भालके व अब्दुल सत्तार यांनी राजीनामे दिले होते.

Loading...

विहित नमुन्यात आलेल्या राजीनामापत्राची दखल अध्यक्षांच्या कार्यालयाकडून घेण्यात येते. अशाप्रकारे केवळ औपचारिकता म्हणून कोऱ्या कागदावर आलेल्या राजीनाम्यावर अध्यक्षांच्या कार्यालयाकडून कोणतेही उत्तर दिले जात नाही, असे या कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. राज्य सरकारच्या एकुण कारभाराचा निषेध करीत गेल्या आठवड्यात आमदार अशिष देशमुख यांनी राजीनामा दिला.

- Advertisement -

Loading...

आमदार देशमुख यांनी दिलेला राजीनामा विहित नमुन्यात दिला होता तसेच त्यांनी स्वत: उपस्थित राहून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यामुळे तो तत्काळ मंजूर करण्यात आला. देशमुख यांनी दिलेल्या राजीनाम्याप्रमाणे वरील सहा आमदारांनी विहित नुमन्यात राजीनामे दिले असते तर ते स्वीकारण्यात आले असते. मग या आमदारांनी जाणीवपूर्वक विहित नुमन्यात राजीनामे न देता केवळ स्टंटबाजी केली का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.