InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राजस्थानसाठी मीच योग्य मुख्यमंत्री-अशोक गेहलोत

राजस्थानसाठी मीच योग्य मुख्यमंत्री असून जनतेने मलाच मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसला मते दिली आहेत, असे म्हणून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे कधीच नव्हते ते सध्या डोके वर काढून कार्यकर्त्यांची दिशाभूल करताना दिसत असल्याचा टोला मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना लगावला. राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधानभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गेहलोत म्हणाले, जनतेने विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच मला मुख्यमंत्री करण्याची मागणी केली होती. काँग्रेसला माझ्यामुळेच मते मिळाली आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी मला नेतृत्‍वाची संधी दिली.  

गेहलोत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते राजेंद्र राठोड यांनी, ‘राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षात सध्या काही ठीक चालले नसून पक्षांतर्गत कुरबुरी वाढल्या आहेत. राजस्थानमधील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खुर्चीसाठीचे राजकारण जनतेच्या विकासाठी घातक आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद या पत्रकार परिषदेनंतर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply