”ज्यांच्या भावना नालायक असतात, तेच नालायकासारखं बोलतात”

मुंबई : लावणी सम्राज्ञी आपल्या लावलीने रसिकांना साद घालणाऱ्या सुरेखा पुणेकर यांनी १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. सुरेखा पुणेकर यांच्या पक्षप्रवेशावरुन विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला आहे.“राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे,” असा टोला प्रवीण दरेकरांनी यावेळी लगावला.

तसेच पुढे “या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे,” अशी टीकाही यावेळी दरेकरांनी केली होती. यानंतर आता मात्र दरेकरांच्या या वक्तव्यावर राज्यातील राजकारण चांगलाच पेटलय. तसेच प्रविण दरेकरांना टीकेचा सामना करावा लागत आहे.यानंतर आता शिवसेनेने प्रविण दरेकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

प्रविण दरेकरांच्या याच वादग्रस्त वक्तव्याचा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी समाचार घेतला आहे. ज्या लोकांच्या भावना नालायका सारख्या असतात, तेच लोक नालायका सारखं बोलत असतात. त्या लोकांना चांगलं बोलता येत नाही. तसेच प्रवीण दरेकरांच्या बोलण्यात कितपत तथ्य असतं, हे राज्यातील जनतेला ठाऊक आहे, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा