InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अध्यादेश निघाला तरी मराठा विद्यार्थ्यांचे मेडिकल पीजी प्रवेश अडचणीत येणार

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू न करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देखील कायम ठेवला होता. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. यावर राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे.

असे असले तरी, आता खुल्या वर्गातील विद्यार्थी-पालक सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. खुल्या वर्गातील पालकांच्या मागणीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांना एसईबीसी कोट्यातुन प्रवेश न देता मेरिट नुसार प्रवेश द्यावे आणि अध्यादेश काढताना राज्य सरकराने आमच्या वर अन्याय होणार नाही याचा सुद्धा विचार करण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय, त्या निर्णयानुसारच प्रवेश प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी खुल्या वर्गातील विद्यार्थी-पालकांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply