सर्व्हेनुसार महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचीच सरशी

उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक 48 जागा आहेत. त्यामुळे महाराष्ट्रतील लोकसभा जागांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. सी वोटर या संस्थेने केलाला सर्व्हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला धक्का देऊ शकतो.

सी वोटरच्या सर्व्हेनुसार 48 पैकी 37 जागांवर भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विजयी होतील. तर केवळ 11 जागांवर काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भातील 10 जागांपैकी 9 जागा युतीला तर 1 जागेवर काँग्रेसचा उमेदवार निवडणून येईल. पश्चिम महाराष्ट्रातील 8 जागांवर युती, तर 4 जागांवर आघाडीचा विजय होईल. मराठवाड्यातील 8 जागांपैकी 5 जागांवर युतीचे तर 3 जागांवर आघाडीचे उमेदवार निवडणून येतील. उत्तर महाराष्ट्रातील 6 जागांपैकी 5 जागा युती तर 1 जागा आघाडीकडे राहिल. मुंबई-कोकणातील 12 जागांपैकी 10 जागांवर युतीचे तर 2 जागांवर आघाडीचे उमेदवार जिंकून येतील असा अंदाज सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.