Oppo Reno 9 Series | ‘या’ दिवशी लाँच होणार Oppo Reno 9 सिरीज

टीम महाराष्ट्र देशा :मोबाईल (Mobile) उत्पादक कंपनी Oppo गेल्या अनेक दिवसांपासून आपली नवीन सिरीज (Series) लाँच करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत नुकत्याच मिळालेल्या मीडिया रिपोर्टनुसार, Oppo ने Oppo Reno 9 सिरीज लाँच करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये सिरीजमध्ये Oppo तीन स्मार्टफोन लाँच करू शकते. Oppo आपली ही सिरीज नवनवीन वैशिष्ट्यांचा सादर करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, Oppo 24 नोव्हेंबरला Oppo Reno 9 ही सिरीज लाँच करणार आहे. यामध्ये कंपनी आपले तीन मॉडेल्स सादर करू शकते. ज्यामध्ये Oppo Reno 9, Reno 9 Pro आणि Reno 9 Pro + यांचा समावेश असू शकतो.

Oppo Reno 9 फीचर्स

Oppo Reno 9 त्या मोबाईलमध्ये 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले असू शकतो. जो फुल एचडी + रेझोल्युशन आणि 120 हॉट्स रिफ्रेश रेटसह उपलब्ध असू शकतो. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर असू शकतो. त्याचबरोबर या फोनमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज असू शकते. त्याचबरोबर या फोनचा कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये ड्युअल कॅमेरा सिस्टीम असू शकते. ज्यामध्ये 64MP आणि 2MP कॅमेरा असू शकतो. Oppo Reno 9 मध्ये 4,500 mAh बॅटरी असू शकते.

Oppo Reno 9 Pro फीचर्स

Oppo Reno 9 Pro या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले असू शकतो. जो फुल एचडी + रिझोल्युशन आणि 120 हॉट्स रिफ्रेश रेटसह मिळू शकतो. हा मोबाईल MediaTek Dimensity 8100 Max या प्रोसेसरसह बाजारात उपलब्ध असू शकतो. या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सिस्टीम आढळू शकते. ज्यामध्ये 50MP आणि 8MP कॅमेरा असू शकतो. या फोनच्या स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 16 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध असू शकते. त्याचबरोबर या फोनमध्ये 67W फास्ट चार्जिंग सुविधेसह 4500mAh बॅटरी असू शकते.

Oppo 9 Pro + फीचर्स

Oppo Reno 9 Pro + या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले असू शकतो. जो फुल एचडी + रिझोल्युशन आणि 120 हॉट्स रिफ्रेश रेटसह मिळू शकतो. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सिस्टीम असू शकते. ज्यामध्ये 50MP, 8MP आणि 5MP कॅमेरा उपलब्ध असू शकतो. हा Qualcomm Snapdragon 8Gen1 फोन प्रोसेसरसह सुसज्ज असू शकतो. या फोनमध्ये 16 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. त्याचबरोबर या फोनच्या बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 80W फास्ट चार्जिंग सुविधा 4700mAh बॅटरी असू शकते.

मीडिया रिपोर्टच्या आधारे Oppo Reno 9 सिरीजच्या सर्व फीचर्स बद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. कारण कंपनीने अद्याप कोणत्याही फोन किंवा त्याच्या फीचर्स बद्दल माहिती दिलेली नाही.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.