‘विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करताहेत; MSP ची व्यवस्था बलणार नाही’

नवी दिल्ली : आज दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा २९ वा दिवस आहे. शेतकऱ्यांनी सोमवारपासून अनिश्चितकाळापर्यंत साखळी उपोषण सुरू केलंय. सरकारकडून शेतकऱ्यांच्या ४० संघटनांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली गेलीय.

मात्र, केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून पाठवण्यात आलेलं बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भातील कोणतंही पत्र आम्हाला मिळालेलं नाही. तसेच यावर सरकार योग्य निर्णय घेण्यास तयार नाही अशी शेतकरी संघटनांच म्हणणं आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. ते दिल्लीतील मेहरौली येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी ठामपणे म्हटलंय की, MSP अर्थात किमान आधारभूत किंमतीची यंत्रणा या कायद्यांमध्येही आहे तशीच राहणार आहे.

तर पुढे अमित शहांनी म्हटलं की, तीन नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. किमान आधारभूत किंमत अर्थात MSP ची व्यवस्था कुणीही शेतकऱ्यांकडून हिरावून घेणार नाहीये. शेतकऱ्यांची जमीन कुणीही हिरावून घेणार नाहीये. सरकार खुल्या दिलाने शेतकरी संघटनांशी चर्चा करायला तयार आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.