Opposition Party | जितेगा भारत! विरोधकांच्या INDIA ची टॅगलाईन ठरली
Opposition Party | टीम महाराष्ट्र देशा: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या एनडीए (NDA) ला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया (INDIA) आघाडी उभारली आहे.
अर्थात इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इंक्लुसिव्ह अलायन्स (Indian National Democratic Inclusive Alliance). यानंतर आता विरोधी पक्षाच्या आघाडीची टॅगलाईन देखील निश्चित करण्यात आली आहे.
The opposition party formed an alliance called ‘India’ to face the BJP alliance
भाजप आघाडीचा सामना करण्यासाठी विरोधकांनी (Opposition Party) ‘इंडिया’ नावाची आघाडी उभारली आहे. त्यानंतर विरोधकांनी आता आपल्या आघाडीची टॅगलाईन देखील निश्चित केली आहे. ‘जीतेगा भारत’ ही इंडिया आघाडीची टॅगलाईन आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ही टॅगलाईन सुचवली असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर या आघाडीला हिंदी टॅगलाईन असावी, असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या (Opposition Party) आघाडीची लवकरच मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये विरोधी आघाडीतील 11 सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे.
या बैठकीमध्ये या सदस्यांची नावे देखील जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, इंडियामध्ये (Opposition Party) काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, जेएमएम, आम आदमी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआय, सीपीएम सारखे तब्बल 26 राजकीय पक्ष सामील झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Neelam Gorhe | या घटनेचं राजकारण करू नका; मणिपूर प्रकरणावरून नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांना खडसावलं
- Gulabrao Patil | “अरे हा शेतकऱ्याचा पोट्टा…”; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात
- Nana Patole | विधानसभा विरोधी पक्षनेता कोण? नाना पटोलेंनी स्पष्ट सांगितलं
- Praniti Shinde | ” मोदी सत्तेत आल्यापासून महिलांच्या विरोधात…”; मणिपूर प्रकरणावरून प्रणिती शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल
- Praniti Shinde | ” मोदी सत्तेत आल्यापासून महिलांच्या विरोधात…”; मणिपूर प्रकरणावरून प्रणिती शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Dnqy7t
Comments are closed.