InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘साले विरोधी पक्ष फालतू आहे, त्यांचं म्हणजे इकडून लफडे कर, तिकडून लफडे कर’

शिवसेनेने गेल्या चार वर्षात काहीच केले नाही, या प्रश्नावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विरोधी पक्षांचा चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेनेच्या बाबतीत बोलणारे विरोधी पक्ष फालतू आहेत. शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी काय केले हे त्यांना माहिती आहे का? अशा शब्दात त्यांनी विरोध पक्षांना चांगलेच सुनावले.

बीड जिल्हा दौऱ्यात माजलगाव शहरात पिक विमा मदत रथ लोकार्पण प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, विरोधी पक्ष फालतू आहे. हे जे बोलतात शिवसेनेबद्दल ते विरोधी पक्ष फालतू आहेत.  शिवसेनेने केलेलेकाम विरोधी पक्षाला दिसत नाही का? कुठे गेले हे साले विरोधी पक्ष, फक्त राजकारण करतात. इकडून लफडे कर, तिकडून लफडे कर आणि पुन्हा निवडणुकीत टीका करायची, अशा शब्दात खैरे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

शिवसेनेबद्दल बोलणारे विरोधी पक्ष फालतू आहेत. चटके बसेपर्यंत आम्ही आंदोलन केले. कर्ज माफी, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले. ‘देता की जाता’ हे आंदोलन शिवसेनेने केल्या यासाठी 5 लाख लोक आले होते. लोकांना न्याय देण्यासाठी प्रत्यक्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा केला. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना आर्थिक, अवजारांची आणि धान्याची मदत केली. इतक सर्व करून देखील आत्महत्या थांबत नाही हे पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा दौरे केल्याचे खैरेंनी सांगितले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply