काँग्रेसला बाजू ठेवून पवारांच्या साथीने ममतादीदी सत्तेची मोट बांधतायत; फडणवीसांचा निशाणा

मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आजपासून मुंबईत आल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबईत भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही त्या भेटणार होत्या. पण प्रकृतीच्या कारणामुळे उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही.

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जींनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच शरद पवार युपीएचे नेते होणार का? असा सवाल ममता बॅनर्जींना विचारण्यात आला होता. त्यावेळी ममता बॅनर्जी भडकल्याचं पहायला मिळाल्या. ‘काय युपीए युपीए करता. युपीए नाहीये आता’, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता काँग्रेसला आगामी लोकसभेत डच्चू देणार असल्याचा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.

तर याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि शिवसेनेवर खोचक टोलेबाजी केली आहे. २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी यांचाच विजय होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र, त्यांना हरवण्यासाठी काय रणनीती करता येईल, यावर खलबतं चालली आहेत. सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याचे प्रयत्न २०१९ मध्येही झाले. पण त्यांना यश आले नाही.

मात्र, लोकांनी मोदी यांच्यावर विश्वास दाखवला. २०२४ सालीही जनता पुन्हा मोदींवरच विश्वास ठेवतील. पण आता लक्षात येत आहे की, काँग्रेसला बाजूला ठेवून बिगर काँग्रेस विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न ममतादीदी करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला पवार साहेबांची साथ आहे. त्यामुळे त्यांचा अंतर्गत सामना सुरू आहे. आमचा सामना कसा करायचा ते ठरवतील, असे फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या