InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मेट्रोसाठी वृक्षतोडीला जॉन अब्राहमचा विरोध

मेट्रो 3 च्या कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येणार आहे. दरम्यान, मेट्रो 3 च्या कारशेडसाठी 33 हेक्टरवरील झाडे तोडण्याचा निर्णय आश्चर्यकारक असल्याचे मत अभिनेता जॉन अब्राहम याने व्यक्त केले आहे. बाटला हाऊस चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलिज करण्यात आला. या ट्रेलर रिलिजदरम्यान मेट्रोसाठी होणाऱ्या वृक्षतोडीवर आपले मत व्यक्त केले.

मेट्रोच्या कारशेडसाठी सरकारने 33 हेक्टरवर पसरलेली वनराई नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. झाडांच्या कत्तल तसेच नव्याने होणार कोस्टल रोड यालाही माझा विरोध आहे, असे जॉन यावेळी म्हणाला. त्यामुळे आपण कोणत्या दिशेने जात आहोत, असा सवालही त्याने यावेळी केला. तसेच आपण पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यात मागे पडत आहोत. पावसाच्या कोसळणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पाण्याची कमतरता भासणार नाही, असेही तो म्हणाला.

सध्या पर्जन्यमान सुधारण्याची गरज आहे. ते न सुधारल्यास येत्या काही वर्षांमध्ये सर्व नद्या आटून जातील. तसेच भविष्यकाळात परिस्थिती अधिक बिकट होईल, असे मत त्याने यावेळी व्यक्त केले. अभिनेता जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply