काँग्रेसशिवाय विरोधकांची एकजूट शक्य नाही : नवाब मलिक

मुंबई : सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं या मुंबई दौऱ्यावर होत्या. यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्या. त्यानंतर ममता बॅनर्जीं आणि शरद पवार यांची हि भेट देशात चर्चेचा विषय बनलीय. या भेटीनंतर देशात अनेक चर्चांना सुरुवात झालीय. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय.

देशात काँग्रेस जुना पक्ष आहे. अनेक वर्ष त्यांनी सत्ता उपभोगली आहे. मागील दोन निवडणुकीत त्यांना केंद्रात सत्ता स्थापन करता आली नाही. मोदी लाटेत सर्वच पक्षांचे काहीही चालले नाही. भाजपला सत्तेपासून दूर करायचे असेल तर विरोधी पक्षांना काँग्रेसशिवाय पर्याय नाही असे मंत्री नवाब मलिक म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीपासून काँग्रेस शिवाय मोट बांधणे अशक्य असल्याचे म्हटले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांनी एकत्र येताना विचार करण्याची गरज आहे. काँग्रेससह नॅान युपीएच्या खासदारांची संख्या १५० आहे. त्यांना पण सोबत आणणे गरजेचे आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांची मोठी आघाडी निर्माण करण्याचे काम देशात होईल. मात्र, याचे नेतृत्व कोण करेल हा आता चर्चेचा विषय नाही. सामूहिक नेतृत्वही एक पर्याय आहे. काँग्रेसशिवाय विरोधकांची एकजूट शक्य नाही. ममता दीदींचेही तेच म्हणणे आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा