“पुढील १०० वर्ष महाराष्ट्रात विरोधी पक्षाची सत्ता येणार नाही”;  संजय राऊतांचा फडनावीसांना टोला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. शरद पवारांनी फडणवीसांना सत्तेचा मंत्र दिला असेल असं सांगत फडनवीसांना टोलाही लगावला.

शरद पवारांनी सत्तेचा मंत्र दिला असेल का? या प्रश्नाचे उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “सत्तेचा मंत्र नक्की दिला असेल. ज्याप्रकारे विरोधी पक्ष राज्यात गोंधळ निर्माण करत आहे, सरकारच्या कामात अडथळे निर्माण करत आहे, हे सर्व असंच सुरु राहिलं तर पुढील १०० वर्ष महाराष्ट्रात विरोधी पक्षाची सत्ता येणार नाही हे नक्कीच शरद पवारांनी सांगितलं असेल”.

“फडणवीस माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते आहेत. शरद पवार राज्यातील आणि देशातील मोठे नेते आहेत. ही एक सदिच्छा भेट होती, यामुळे राजकारण तापणार नाही. कोरोना संकटात विरोधी पक्षाने कशाप्रकारे भूमिका घेतली पाहिजे, काम केलं पाहिजे. महाविकास आघाडीला कोणत्या प्रकारचं सहकार्य विरोधी पक्षाने करण्याची गरज आहे यासंबंधी शरद पवारांनी फडणवीसांना मार्गदर्शन केलं असेल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“ऑपरेशन लोटस ना बंगालमध्ये होणार ना महाराष्ट्रात. राज्याला विरोधी पक्षांची मोठी परंपरा आहे. शरद पवारही विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी त्यांनी उत्तम काम केलं होतं. त्यामुळे फडणवीस त्यांच्याकडे गेले असतील तर त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं असेल,” असंही त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्रात आपली परंपरा आहे. इतर राज्यांप्रमाणे राजकारणात आपण शत्रुत्व घेऊन बसत नाही. भेटीगाठी, चर्चा होत असते. त्यामुळे या भेटीकडे फार राजकीय हेतूनं पाहणं चुकीचं आहे,” असंही त्यांनी सांगितलं असेल.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा