ब्रेनडेड झालेल्या तरुणाचे अवयवदान ; ५ लोकांना मिळाले नवीन आयुष्य !

माणगावचा महेश याची सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे. २५ वर्षीय तरुणाने ५ लोकांना नवीन आयुष्य दिले आहे. काही दिवसांपूर्वी , रात्रीच्यावेळी महेशच्या गाडीचा अपघात झाला होता. आणि या अपघातामध्ये महेशला खूप मार लागला होता.त्याला जे जे रुग्णालयामध्ये डॉक्तरांच्या देखरेखी खाली ठेवण्यात आले होते. व्हेंटिलेटरवर असणारा महेश बेशुद्धच होता. वैधकीय चाचण्यांनंतर त्याला ब्रेनडेड झाल्याचे घोषित करण्यात आले.यानंतर महेशच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांनी केलेल्या समुपदेशनामुळे आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचे ठरवले.

धक्कादायक : सांगलीतील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा शिवसेना नेत्याकडून खून !

हृदय जसलोक रुग्णालय, यकृताचा एक भाग अपोलो तर दुसरा भाग ज्युपिटर रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे. एक किडनी वोक्हार्ड येथे पाठवण्यात आली. तर दुसरी किडनी जे. जे. रुग्णालयामध्ये किडनीवर उपचार घेणाऱ्या एका रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आली. यामुळे पाच जणांना या तरुणाने जाता जाता जीवनदान दिले आहे.

दिल्ली निवडणूक : दिल्ली काँग्रेस अध्यक्षांनी स्वीकारला पराभव;राजीनामा देण्याची शक्यता !

प्रत्यारोपणाची ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी जे. जे. रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांसह कर्मचारीही ४८ तास अहोरात्र काम करत होते. महेशचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. आमच्या लेकरामुळे कुणाच्या लेकराचा जीव वाचला तर महेशला हीच श्रद्धांजली ठरेल, हे सांगताना कुटुंबीयाचा स्वर कातर झाला होता.

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा