Oscar Winning | 2023 चा ऑस्कर भारताच्या नावे; ‘नाटू नाटू’ गाण्यासह ‘द एलिफंट विस्परर्स’ या माहितीपटानं मारली बाजी

Oscar Winning | मुंबई : भारतात गेली २१ वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात ऑस्करला नॉमिनेशन मिळालेले अनेक सिनेमे आहेत. चित्रपटसृष्टीत जागतिक आणि नामांकित मानला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर पुरस्कार (Oscar Award) आहे. हा पुरस्कार मिळणं म्हणजे भाग्याची बाब असते. बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्ममध्ये भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स'(The Elephant Whispers) या लघुपटाला बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म (Best Documentary Short Film) चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर दुसरीकडे राजामौलीच्या ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटातील ‘नाटू नाटू'(Natu Natu) या गाण्यासाठी बेस्ट ओरिजीनल साँग’चा (Best Original Song) पुरस्कार पटकावण्यात आला. यामुळे आता भारताची मान ऑस्करमध्ये उंचावली आहे. यामुळे यंदाचा २०२३ च्या ऑस्कार पुरस्काराने भारताचे नाव सुवर्ण अक्षरात लिहीण्यात आलं आहे.

ऑस्करमध्ये मस्तानी दीपिकाची उपस्थिती Deepika Padukone Attend An Oscar Award

भारतातील डिंपल गर्ल, दिपू, मस्तानी अर्थातच दीपिका पादुकोण हीची ऑस्करमध्ये उपस्थिती होती. यंदाच्या २०२३ या वर्षातील प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणने उपस्थिती दर्शवली होती.

२०२३ भारतासाठी लकी  2023 This Year Lucky For Indian cinema 

अनेक वर्षांपासून भारतीय चित्रपटसृष्टीत चित्रपटांना फक्त ऑस्कार पुरस्काराचे नामांकन देण्यात आलं होतं. परंतु यंदाच्या वर्षी २०२३ मध्ये ऑस्कर या पुरस्काराचे नाव भारताने सुवर्ण अक्षरात लिहले आहे. भारतातील दक्षिणात्य आरआरआर (RRR) सिनेमाच्या नाटू नाटू (Natu Natu) या गाण्यला बेस्ट ओरिजिनल सॉंग (Best Original Song Award) हा पुरस्कार मिळाला. तर (The Elephant Whispers) द एलीफंट व्हीस्पेर्स उत्कृष्ट माहितीपट  (Best Documentry Short Film) पुरस्काराने भारताचं उंचावलं आहे.

कोणत्या भारतीय चित्रपटांना मिळाले ऑस्करचं नामांकन? Which is Indian Film Got Oscar Nomination?

‘मदर इंडिया’, ‘द हाऊस दयाट आनंदा बिल्ट’, ‘एन एन्काऊंटर विथ फेस’, ‘सलाम बॉम्बे’, ‘लगान’, लिटिल टरोरिस्ट, ‘रायटिंग विथ फायर’, ‘द व्हाईट टायगर’ या सिनेमांना ऑस्करचे नामांकन मिळाले आहे.

महत्वाच्या बातम्या