InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

आरोपीतर्फे अन्य लोकांना याचिका करता येणार नाही – महाराष्ट्र सरकार

- Advertisement -

नवी दिल्ली : एल्गार परिषदेच्या निमित्तानं देशात अराजक पसरवण्याचा कट रचल्याप्रकरणी स्थानबद्ध करण्यात आलेल्या पाच जणांच्या समर्थनात दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र  सरकारानं आपली बाजू  मांडली. ज्यांना ताब्यात घेतले आहेत ते आरोपी असून  आरोपीतर्फे अन्य लोकांना याचिका करता येत नसल्याचा मुद्दा महाराष्ट्र सरकारने न्यायालयात मांडला आहे. ‘एल्गार परिषद’ संदर्भात अटक करण्यात आलेल्या व्यक्तींविरोधात आकसबुद्धीनं कारवाई केली गेलेली नसून ते सरकारनं बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मत भिन्नतेमुळे किंवा त्यांच्या विरोधी वक्तव्यांमुळे त्यांना अटक करण्यात आलेली नाही, असं महाराष्ट्र सरकारनं न्यायालयासमोर सांगितलंय.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.