शिवसेनेसारखं काम इतर राज्यांना जमलं नाही, म्हणून तिथे चिता पेटलेल्या आहेत !

मुंबई : “महाराष्ट्रात राजकीय कार्यकर्ते सरकारला समांतर अशी कोविड यंत्रणा उभी करत आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती चांगली आहे. इतर राज्यांमधील पक्षांना मात्र ते जमलं नाही. त्यामुळे तिथे आज चिता पेटलेल्या आहेत”, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात शिवसेनेतर्फे ३ कोविड सेंटर उभारण्यात आली असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या कोविड सेंटर्सचे उदघाटन झाले. यावेळी संजय राऊत बोलत होते.

राज्यात राजकीय कार्यकर्ते सरकारला समांतर अशी कोविड यंत्रणा उभी करत असल्याने कोरोनास्थिती नियंत्रणात असल्याचे सांगताना संजय राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरे यांच्यासोबत पुण्यामध्ये ज्या ३ कोविड सेंटरचं उद्घाटन केलं ती सरकारी नसून शिवसेनेच्या माध्यमातून उभी केली आहेत. महारष्ट्राची स्थिती चांगली असण्याचे हे कारण आहे की सरकारला समांतर अशी कोविड सेंटर आणि यंत्रणा राजकीय कार्यकर्तेही उभे करत आहेत.

यामुळे सरकारवरचा भार कमी होतो. अन्य राज्यांमध्ये मात्र तसे होत नाही. अनेक राज्यांमध्ये शिवसेनेसारखं काम इतर पक्षांना जमलं नाही. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये आज चिता पेटलेल्या दिसत आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा