….नाहीतर खासदारकीचा राजीनामा देऊन राजकारणाला रामराम करणार – छत्रपती उदयनराजे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या राज्यातील वातावरण चांगलचं पेटलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली असताना आता छत्रपती उदयनराजेंनीही यात उडी घेतली आहे. मी राजकारण करत नाही, पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच अशी भावना भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली आहे.

सर्व समाजांबद्दल मला आदर आहे, प्रत्येकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, न्यायालयानेही सर्व लोकांना समान अधिकार द्यावेत न्याय मिळाला नाही तर उद्रेक होणं स्वाभाविक आहे. मराठा आरक्षणावर सरकारने काही केलं तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार, हे मी मनापासून सांगतोय असं उदयनराजे म्हणाले

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.