.. नाहीतर मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील ; संभाजी ब्रिगेडचा गंभीर इशारा

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या राजकारणामुळे मराठा आरक्षणाचा बळी दिला जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर अध्यादेश काढून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकाही सादर करावी. याबाबत लवकरात लवकर निर्णय न झाल्यास मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला.

सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणीनंतर मराठा आरक्षणाचा खटला घटनापीठाकडे वर्ग करण्यात आला. मात्र, २०२०-२१ वर्षात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली.

या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने शनिवारी पुण्यात पत्रकारपरिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी म्हटले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. राज्यातील महाविकास आघाडी, केंद्र सरकार, राज्य भाजप यांच्यातील राजकारणाचा हा बळी आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचा आरोप त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा