“… अन्यथा तुमच्या वयाचा विचार न करता आम्ही शिवभक्त आपले धोतर फेडण्यास मागेपुढे पाहणार नाही”

मुंबई : औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडण्याची चिन्हं आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, मराठी राजभाषा दिन आणि श्री दास नवमी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी बोलताना कोश्यारी यांनी म्हटलं की, चाणक्याविना चंद्रगुप्तांना कोण विचारेल? समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारणार? असं राज्यपालांनी म्हटलं आहे. गुरुचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे. संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे, असंही ते म्हणाले होते. यावरून आता मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यपालांना इशारा दिला आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं. छत्रपती शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील तर त्याविषयी बोलताना त्यात नाक खुपसू नये. आपले छत्रपतींचे खरे विचार आपसूक बाहेर आले. आपलं वय आणि वक्तव्य पाहता निवृत्तीची गरज आहे, असं वाटतं. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली आहे. तात्काळ राज्यपालांची उचलबांगडी करावी. असे राज्यपाल महाराष्ट्राला नको. राज्यपाल महोदय आपण माफी मागावी. अन्यथा तुमच्या वयाचा विचार न करता आम्ही शिवभक्त आपले धोतर फेडण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा विनोद पाटलांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा