‘आमची युती फक्त महाराष्ट्रात, संजय राऊतांच्या वक्तव्याचा काँग्रेसला फरक पडत नाही’

मुंबई : भाजपला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग व्हावा यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुढाकार घेताना दिसत आहेत. मात्र संजय राऊत यांच्या एकत्र लढण्याच्या विचाराला काँग्रेसने धक्का दिला आहे. काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी करून गोव्यात महाविकास आघाडीच्या प्रयोगाची पुनरावृत्ती करण्यात काँग्रेसला अजिबात रस नसल्याचे स्पष्ट होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून भाजपाला धूळ चारू शकतात, असा दावा संजय राऊत सातत्याने करत होते. मात्र काँग्रेस याला फारसा प्रतिसाद देताना दिसत नाही. मात्र गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर संजय राऊत यांनी संतापून काँग्रेसला टोमणा मारला. काँग्रेसचे माहीत नाही, पण शिवसेना आणि एनसीपी गोव्यात एकत्र आहेत.

काँग्रेससोबत यावी म्हणून आम्ही प्रयत्न केला. पण त्यांना असे वाटते की त्यांना ४० पैकी ४५ जागा मिळतील! पैकीच्या पैकी जागा त्यांना गोव्यात मिळू शकतात असे त्यांना वाटते. इतका आत्मविश्वास एखाद्या पक्षाला असेल तर आपण त्यांच्या आत्मविश्वासाला कशाला तडा द्यायचा? त्यांनी ४० पैकी ४५ जागा जिंकल्या तरी हरकत नाही, असं राऊत म्हणाले.

यानंतर यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्ही युती केल्यामुळे सत्तेत सोबत आहोत. त्यामुळे गोवा व इतर राज्यात युती बाबत काँग्रेस हायकमांड निर्णय घेणार आहे. सोबतच कोणत्या पक्षासोबत युती केल्याने कोणाच्या जागा वाढतील हे येणारी निवडणूक ठरवेल, असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला आहे. भंडाऱ्यांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक प्रचार दरम्यान ते बोलत होते.

गोव्यात कॉंग्रेस अती आत्मविश्वासाने निवडणूक लढणार आहे. मात्र गोव्यात कॉंग्रेसचा एक अंकी आमदार येणार असल्याची टीका राऊत यांनी केली होती. राऊत यांचे एक अंकी आमदार हे वक्तव्य त्यांच्या शिवसेना पक्षाशी संबधित असल्याचे वड्डेट्टीवार म्हणाले. त्यामुळे काँग्रेसला त्यांच्या वक्तव्याचा कोणताही फरक पडत नाही.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा