“आमचं आजही आव्हान आहे हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा”

मुंबई : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात आज पार पडला. प्रतिवर्षी शिवाजी पार्कवर होणार सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “आपला आवाज कोणी दाबू शकत नाही, आपला आवाज दाबणारा जन्माला यायचाय,” अशी सुरुवात करत अनेकांवर बाण डागला.

यानंतर आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरोधकांवर तुटून पडले. आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झालेले दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य करताना मोठ्या प्रमाणावर टीका केलीय. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपला जाहीर सरकार पाडण्याचे आव्हान दिलं आहे. भाजपने महाविकास आघाडी सरकार पाडून दाखवावं असं म्हटलं आहे.

तसेच भाजपने अनेक प्रयत्न केले सरकार पाडण्याचे पण सरकार पडत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. विचार एक आहेत म्हणून आम्ही भाजपसोबत युती केली. भाजपची पालखी वाहण्यासाठी नाही. तसेच आगामी काळात मी माझ्या शिवसैनिकाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी बसवणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा