“आमच्या लाडक्या अमृता फडणवीसांना काही काम नाही, पक्षाने त्यांची प्रवक्तेपदी नेमणूक करावी”

पुणे : राज्यातील काही भागांत कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. ज्या शहरात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, तिथे राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. मात्र, पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असूनही राज्य सरकारने पुण्यातले निर्बंध जैसे थे ठेवले आहेत. याच मुद्यावर अमृता फडणवीस यांनी विधान केलं असून पुणेकरांना एक खास सल्लाही दिला होता.

अमृता फडणवीस यांनी आक्षेप घेत पुण्याबाबत सरकारने असा निर्णय का घेतला हे कळत नसल्याचं म्हटलं. त्याचवेळी कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा सल्लाही अमृता फडणवीसांनी पुणेकरांना दिला. धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी अप्रतिम घडवलेल्या वस्तूंच्या महोत्सवाचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन पुण्यनगरीत पार पडलं. यावेळी पुण्याच्या निर्बंधाबाबत असलेल्या पुणेकरांच्या आक्षेपावर बोलताना त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला होता.

पुढे अमृता फडणवीस यांनी तसेच सरकारवर देखील टीका केली आहे. याला शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या लाडक्या अमृता फडणवीस यावेळी पुण्याला फिरायला गेल्या होत्या. तिथं त्यांनी नेहमीप्रमाणे राजकीय वक्तव्य केलं. सध्या त्यांना कोणतंही काम नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांची प्रमुख प्रवक्तेपदी नेमणूक करावी, अशी बोचरी टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा