आमची श्रद्धा बाळासाहेबांच्या पायाशी होती, शिवसेनेनं ते काही शिल्लक ठेवलं नाही!

मुंबई : माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. चिपळूणमध्ये आलेल्या महापुराच्या मुद्द्यावरुन मुंबईत शिवसेनेनं नवी वसुली मोहीम सुरु केल्याचा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केलाय. मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी त्याबाबत माहिती दिली आहे.

शिवसेना सध्या महापुराच्या नावाखाली मुंबईकरांकडे वेगळी वर्गणी मागत आहे. ही एकप्रकराची शिवसेनेची नवीन वसुली मोहीम आहे, असा घणाघाती आरोप निलेश राणे यांनी केलाय. त्याचबरोबर शिवसेनेला कधीपर्यंत पोसणार असा सवालही निलेश राणे यांनी मुंबईकरांना विचारलाय. त्याचबरोबर शिवसेनेला कधीपर्यंत पोसणार असा सवालही निलेश राणे यांनी मुंबईकरांना विचारलाय.

दुसरीकडे निलेश राणे यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केलीय. आदित्य ठाकरेंना पाहून बाळासाहेबांची शिवसेना आठवते का? असा सवाल त्यांनी केलाय. आदित्य ठाकरेंना बघून सुशांतसिंग हत्या प्रकरण आठवतं. बाटली आणि ग्लास आठवतो, अशा शब्दात निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर हल्ला चढवला.

जिथं बाळासाहेब नाहीत तिथल्या पक्षात कसली श्रद्धा, असा सवालही त्यांनी केलाय. आमची श्रद्धा बाळासाहेबांच्या पायाशी होती. शिवसेनेनं ते काही शिल्लक ठेवलं नाही. शिवसेना भवनात आता सर्व अमराठी लोक दिसतील. तिथे आलेले सर्व बिलिंगसाठी आलेले असतात. मातोश्रीवर बॅग घेऊन आलेल्या माणसालाच प्रवेश मिळत असल्याचा घणाघातही निलेश राणे यांनी यावेळी केलाय.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा