आमचं पण सरकार येणार आहे, तेव्हा तुम्हाला सुट्टी देणार नाही; खोतांचा सरकारला इशारा

सांगली : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात राजकीय वातावरण कायम गरम असल्याचं जाणवत आहे. आरोप-प्रत्यारोपाची मालिका कायम सुरूच आहे. तसेच भाजप आणि मित्र पक्ष हे नेहमी महाविकासाआघाडी सरकार जाऊन आमचं सरकार येणार असल्याचं वक्तव्य करत आहे. त्यात आता माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी भर टाकली आहे.

राज्य सरकारचा भ्रष्ट कारभार आता दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसतंय. दिवसभर गोळा झालेला पैसा संध्याकाळी तिघे भाऊ म्हणजेच तिन्ही पक्ष एकेक रुपया वाटून खात आहेत. या सरकारमध्ये मंत्री, अधिकारी, आमदार पैसे हाणतायेत, गंभीर टीका सदाभाऊ खाेत यांनी महाविकास आघाडीच्या काराभावर व्यक्त केली. यावेळी ते आटपाडी येथे बाेलत हाेते.

सदाभाऊ म्हणाले शेतक-यांचे सरकारने हाल चालवले आहेत. कोण काही बोलले की लगेच त्याच्यावर सरकारी कामात अडथळा, तडीपारी असे गुन्हे दाखल करीत आहेत. परंतु ध्यानात ठेवा आमचं पण सरकार येणार आहे, तेव्हा तुम्हाला सुट्टी देणार नाही असा इशारा देखील सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

हे सगळ्यात इतके पैसे खातात पण नर्व्हस काही होत नाहीत. आपल्या गावात एकाद्याने चोरी केली, त्याच्यावर आळ आला तर तो गाव सोडून जातो. पण यांनी तर सारे राज्य हाणलं तरी पण हाथ हलवत येताहेत. अजून काय शिल्लक आहे का बघायला या जातीला लाजच नाही. आमचं सरकार आले तर वीजेचे बिल माफ करणार अशी घाेषणा त्यांनी केली हाेती. आता काय म्हणताहेत बिल भरा बिल भरा नाही तर वीज ताेडू. हे असं वागणं बर नव्हं असा टाेला सदाभाऊंनी महाविकासच्या सरकारला लावला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा