‘ओवेसी भाजपाच्या यशाचे सूत्रधार’, ‘फोडा-झोडा व जिंका’; शिवसेनेचा निशाणा

मुंबई : मुसलमान या देशाचे नागरिक आहेत व त्यांनी या देशाचे संविधान पाळूनच आपला मार्ग बनवला पाहिजे, असे सांगण्याची हिंमत ओवेसींमध्ये ज्या दिवशी येईल, त्या दिवशी ओवेसी यांना राष्ट्रीय नेते म्हणून प्रतिष्ठा मिळेल, नाहीतर भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाईल. आज ओवेसींच्या सभांमधून ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे उठत आहेत. त्यामागेही राजकीय सूत्र आहेच.
तसेच फोडा, झोडा आणि विजय मिळवा. ओवेसी यांनाही त्याच विजयाचे सूत्रधार म्हणून वापरले जात आहे. पाकिस्तानचा वापर केल्याशिवाय भाजपाचे राजकारण पुढे सरकणार नाही का? असा सवाल करत शिवसेनेने रोखठोकमधून टोला लगावला आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत काय काय पाहावं लागेल, घडवलं जाईल ते सांगता येत नाही. भारतीय जनता पक्षाच्या यशस्वी वाटचालीचे पडद्यामागचे सूत्रधार मियाँ असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचा पक्ष चांगलाच कामाला लागल्याचं दिसत आहे, असं म्हणत शिवसेनेनं अग्रलेखातून ओवैसींवर सडकून टीका केलीये.
निवडणुकांचा हा असा लोकशाहीवादी खेळ सुरूच राहील. रायबरेलीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणा म्हणजे राष्ट्रभक्तांच्या छातीवर केलेले वार आहेत. ओवेसी व त्यांच्या एम.आय.एम. पक्षाचे नक्की ध्येयधोरण काय आहे? मुसलमानांवरील अन्यायाचा डंका पिटत हे महाशय देशभर फिरत आहेत. त्यांच्या राजकारणाचे प्रायोजकत्व कोणी वेगळेच लोक करत असावेत?, अशी टीका शिवसेनेनं केलीये.
महत्वाच्या बातम्या
- “ममता बॅनर्जी मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय, अनेक राज्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास तयार”
- काँग्रेसला दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला; राज्यसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार
- “बारामती हा महाराष्ट्राचाच भाग आपण तो देखील जिंकू”
- “मी जनरल डायरसारखा प्रचार करत पार्थ पवारला पराभूत केलं”
- सरकार कोसळावे म्हणून देव पाण्यात ठेवणारे स्वतःच पाण्यात जातील; वडेट्टीवारांचा पलटवार