PAK vs ENG | पाकिस्तान संघामध्ये मोठं चक्रीवादळ येण्याची शक्यता, ‘या’ खेळाडूंवर होऊ शकतात परिणाम
PAK vs ENG | टीम महाराष्ट्र देशा: पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यामध्ये झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये पाकिस्तान संघाची अवस्था खूप वाईट होती. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. कारण यापूर्वीही बोर्डाने बीसीसीआयवर निशाणा साधला होता. पुढच्या वर्षी भारतामध्ये होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ भारतामध्ये पाठवू नये असे, त्यांनी उघडपणे सांगितले होते. या माहितीनंतर, पाकिस्तान संघामध्ये अजून एक वादळ येण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) कसोटी सामन्यांनंतर पाकिस्तान संघामध्ये ‘हे’ बदल होऊ शकतात
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये बाबर आझम (Babar Azam) च्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाची अवस्था वाईट होती. पाकिस्तानला घरच्या मैदानावर तीनही कसोटी सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. या परिस्थितीनंतर बाबर आझमचे कसोटी कर्णधार पद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. तर, टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तान संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहे.
पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांकडून दिल्या जात असलेल्या बातम्यांच्या अनुसार, रमीज राजा यांना पीसीबी अध्यक्ष पदावरून खाली उतरावे लागू शकते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना ही खुर्ची सोडावी लागेल, अशा बातम्या सातत्याने पाकिस्तान मीडियामध्ये येत आहे. कारण मीडिया रिपोर्टनुसार, रमीज राजा यांच्या अध्यक्षतेखाली बाबर आझमला कर्णधार म्हणून भरपूर सूट देण्यात आली होती. दरम्यान, पाकिस्तान संघाने इंग्लंडविरुद्ध केलेल्या कामगिरीमुळे बाबरला कसोटी कर्णधार पद सोडावे लागू शकते.
पाकिस्तान आणि इंग्लंड याच्यामध्ये झालेल्या तीन सामन्याच्या या कसोटी मालिकेमध्ये इंग्लंड संघाने 1-0 ने आघाडी घेतली होती. तर, दुसरा सामना सुरू होण्याच्या आधी मुलतानमध्ये गोळीबार झाला होता. इंग्लंड संघ मैदानापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये वास्तव्य करत होता. त्या हॉटेलपासून एक किलोमीटर अंतरावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती.
महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Weather Update | राज्यात थंडीत वाढ, तर तापमानात घट
- Uddhav Thackeray | “आमचा मोर्चा हा देवेंद्र फडणवीस साईज होता”; उद्धव ठाकरेंचा पलटवार
- Uddhav Thackeray | “आपला पक्ष पहिला, तुमचा पक्ष दुसरा म्हणणं बालिशपणा”; उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला
- Devendra Fadanvis | ‘लव्ह जिहाद’बाबत महाराष्ट्रातही कायदा होणार?; देवेंद्र फडणवीस म्हणाले…
- Winter Session 2022 | NIT भूखंड मुद्द्यावरुन एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, विरोधकांचा विधानसभेत गदारोळ
Comments are closed.