PAK vs NZ | पत्रकार ओरडल्यावर बाबर आझमने दिले भयानक रिएक्शन, पाहा VIDEO

PAK vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) पहिल्या कसोटीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) एका पत्रकाराच्या वागणुकीवर नाराज झाल्याचे दिसले आहे. पत्रकार परिषद सुरू असताना बाबर आझम पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देत होता. अशा परिस्थितीमध्ये एका पत्रकाराला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे तो पत्रकार बाबरवर ओरडला. त्यानंतर बाबरने पत्रकाराला भयानक रिएक्शन दिले.

सोशल मीडियावर बाबर आझमचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाराजी व्यक्त केली आहे. पत्रकार परिषद सुरू असताना बाबरने पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना निवांतपणे उत्तरे दिली. मात्र, त्याने एका पत्रकाराला यावेळी खतरनाक रिएक्शन दिले. पत्रकार परिषद सुरू असताना बाबर त्यामधून बाहेर पडत होता. तेव्हा एक पत्रकार ओरडला “ही पद्धत योग्य नाही, इथे आम्ही प्रश्नांसाठी हात वर करत आहोत आणि तुम्ही चालला आहात.” त्याच्या या बोलण्यावर बाबरने खतरनाक रिऍक्शन दिली आहे.

या प्रतिक्रियेनंतर बाबर कोणतेही उत्तर न देता निघून गेला. मात्र, जाताना त्याने त्या पत्रकाराकडे नजर रोखून पाहिले. त्याची ही रिएक्शन कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. दरम्यान, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना कराची येथे 2 जानेवारी 2023 पासून खेळला जाणार आहे.

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने घरच्या मैदानावर सात कसोटी सामने खेळले आहे. त्यापैकी पाकिस्तान संघ एकही सामना जिंकू शकला नाही. यामध्ये पाकिस्तानला चार कसोटी सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. तर तीन सामने अनिर्णित ठरले होते.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.