PAK VS SL । श्रीलंकेने आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानवर मिळवला दणदणीत विजय, सहाव्यांदा ट्रॉफी जिंकली

दुबई : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाने पाकिस्तान संघाचा 23 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. श्रीलंकेच्या संघाने सहाव्यांदा आशिया कप जिंकला आहे. अंतिम सामन्यात प्रथम खेळताना श्रीलंकेच्या संघाने 6 गडी गमावत 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 147 धावा करून बाद झाला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला.

श्रीलंकेचा सलामीवीर कुसल मेंडिस खाते न उघडताच बाद झाला. त्याच्यापाठोपाठ पथुम निसांकानेही 8 धावा करून आगेकूच केली. धनंजय डी सिल्वाने 28 धावा केल्या. आणखी काही गडी बाद झाल्याने धावसंख्या 5 विकेट्सवर 58 अशी झाली. येथून भानुका राजपक्षेने वनिंदू हसरंगाच्या साथीने अर्धशतकी भागीदारी केली. हसरंगा 21 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. राजपक्षेने अर्धशतक झळकावले आणि तो शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने 45 चेंडूत नाबाद 71 धावा करत संघाला 6 गडी बाद 170 धावांपर्यंत नेले.

पाकिस्तानकडून हरिस रौफने ३ बळी घेतले. यानंतर पुढे खेळताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. कर्णधार बाबर आझम 5 आणि फखर जमान खाते न उघडताच बाद झाले. यानंतर रिझवान आणि इफ्तिखार यांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. इफ्तिखास ३२ धावा करून बाद झाला आणि येथूनच सामना श्रीलंकेच्या बाजूने वळला. रिझवान एका टोकाकडून धावा करत राहिला पण दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत राहिल्या. रिझवानही 49 चेंडूत 55 धावा करून बाद झाला. अशाप्रकारे पाकिस्तानचा संघ शेवटच्या चेंडूवर 147 धावांवर बाद झाला. श्रीलंकेकडून प्रमोद मदुशनने 4 बळी घेतले. हसरंगाने ३ बळी घेतले.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.