PAK vs ZIM : पाकिस्तानने शेवटच्या चेंडूवर केली ‘चिटिंग’, तरीही झाला लाजिरवाणा पराभव, हा घ्या पुरावा

PAK vs ZIM | पाकिस्तान संघाचा झिम्बाब्वेकडून लाजिरवाणा पराभव झाला. T20 विश्वचषकाच्या सुपर 12 सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा 1 धावाने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 131 धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्युत्तरात बाबर आझमचा संघ 20 षटकांत केवळ 129 धावाच करू शकला. पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज होती. शाहीन शाह आफ्रिदीने एक धाव पूर्ण केली होती. तो दुसरी धाव घेऊन धावसंख्या बरोबरी करण्याचा प्रयत्न करत होता, पण दुसरी धाव पूर्ण करण्याआधीच तो धावबाद झाला.

शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानने विजयासाठी चिटिंग केल्याचे समोर आले. तरीही त्यांना विजय मिळवता आला नाही. पाकिस्तानने केलेल्या  चिटिंगचा पुरावा ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉग याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो म्हणाला, “गोलंदाजी करण्यापूर्वी क्रीज सोडल्यास कठोर शिक्षेची गरज का आहे! काल रात्री सामन्याचा शेवटचा चेंडू!”

झिम्बाब्वेचा गोलंदाज ब्रॅड इव्हान्स चेंडू टाकण्याआधी नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभा असलेला मोहम्मद वसीम धावांसाठी क्रीजबाहेर उभा असलेला आहे. म्हणजेच पाकिस्तानने शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी एक प्रकारे चिटिंग केली आहे. याचा पुरावा हॉगने दिला. असे करुनही निकाल पाकिस्तानच्या बाजूने लागला नाही आणि संघाला 1 धावाने सामना गमवावा लागला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.