InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आयपीएलच्या प्रक्षेपणावर पाकिस्तानमध्ये बंदी

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या सामन्यांना उद्यापासुन सुरूवात होणार आहे. आयपीएलच्या थेट प्रक्षेपणावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान सुपर लीगचे भारतातील प्रक्षेपण बंद केले होते. आता त्याचमुळे आयपीएलच्या सामन्यांचे पाकिस्तानमध्ये थेट प्रक्षेपण न करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.

स्पर्धेची सुरूवात उद्यापासून ( 23 मार्च) होणार असून, पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि राॅयल चॅलेंजर बैग्लोर यांच्यामध्ये खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.