InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पाकिस्तानने रद्द केलेली समझोता एक्सप्रेस’ पोहचली भारतात

- Advertisement -

भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असेलली समझौता एक्सप्रेस पाकिस्ताने अचानक रद्द केली आहे. ही रेल्वे सेवा रद्द केल्यामुळे ११७ प्रवासी अटारी रेल्वे स्थानकावर अडकून पडले होते. पाकिस्तानी ड्रायव्हर आणि गाईड प्रवासातच रेल्वे सोडून माघारी निघून गेले होते. त्यानंतर भारतीय कर्मचाऱ्यांनी अटारी रेल्वे स्थानकावर जाऊन समझोता एक्सप्रेस दिल्लीमध्ये आणली. आज सकाळी ८ वाजता एक्सप्रेस दिल्लीमध्ये पोहचली. साडेचार तास उशिराने रेल्वे भारतात दाखल झाली.

या रेल्वेमध्ये ७६ भारतीय आणि ४१ पाकिस्तानी प्रवासी होते. भारताने काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारताशी सर्व स्तरावर संबध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारत पाकिस्तान दरम्यान सुरु असलेली समझोता एक्सप्रेस सेवा पाकिस्तानने अचानक रद्द केली.

Loading...

- Advertisement -

पाकिस्तानमधील वाघा सीमेपलीकडील स्थानकावर रेल्वे सोडून पाकिस्तानी ड्रायव्हर आणि गाईड माघारी गेले. पाकिस्तानने रेल्वे भारतात नेण्यास नकार दिला. त्यानंतर भारतीय कर्मचाऱ्यांनी रेल्वे इंजिन नेऊन समझोता एक्सप्रेस अटारी स्थानकापर्यंत आणली. त्यानंतर रेल्वे रात्री दीडच्या सुमारास अटारी स्थानकावरुन दिल्लीच्या दिशेने निघाली होती. आज (शुक्रवारी) सकाळी रेल्वे दिल्ली स्थानकावर पोहचली.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.