Pakisthan Army chief | लेफ्टनंट जनरल सय्यद आसिम मुनीर घेणार पाकिस्तान लष्कर प्रमुखाची जागा

टीम महाराष्ट्र देशा: पाकिस्तान (Pakisthan) मध्ये नव्या लष्कर प्रमुखांची (chief of Army ) घोषणा करण्यात आली आहे. जनरल कमर जावेद बाजवा यांची जागा आता लेफ्टनंट जनरल सय्यद आसिम मुनीर (Lt. Gen. Syed Asim Munir) घेणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाद शरीफ यांनी सय्यद आसिफ मुनीर यांच्या नावाची घोषणा केली आहे. लेफ्टनंट जनरल सय्यद आसिफ मुनीर हे आयएसआयचे प्रमुख राहिलेले आहेत.

61 वर्षीय जनरल कमल जावेद बाजवा 29 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहे. बाजवा यांचा कार्यकाळ जवळजवळ 6 वर्षांचा होता. यामध्ये त्यांच्या कार्यकाळाला तीन वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. तर मुनीर यांची ऑक्टोबर 2018 मध्ये इंटेलिजन्स चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

पाकिस्तान सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीसाठी संरक्षण मंत्रालयाकडून नावाचे पॅनल मिळाले झाले होते. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, संरक्षण मंत्रालयाकडून जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष आणि लष्कर प्रमुखांच्या नावांची एक यादी मिळाली होती. लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा यांची जॉईंट चीफ ऑफ स्टाफ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर लेफ्टनंट जनरल सय्यद आसिफ मुनीर यांची लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुनीर 2018-19 मध्ये 8 महिने आयएसआय प्रमुख होते. यामध्ये इमरान खानने आपल्या जवळच्या सहकारी फेज हमीदला आयएसआय प्रमुख बनवले होते तर मुनीरची गुंजरावाला कॉर्प्स कमांडर म्हणून बदली केली होती. मुनीर यांनी दोन महिन्यानंतर टू स्टार जनरल पदावर बढती मिळवली होती.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.