Pan Card Update | सरकारी वेबसाईट वरून E-Pan Card कसे करायचे डाऊनलोड, जाणून घ्या
टीम महाराष्ट्र देशा: पॅन कार्ड (Pan Card) हे भारताच्या आयकर विभागाने (IT) जारी केलेले एक राष्ट्रीय ओळखपत्र आहे. पॅन कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. त्यामुळे पॅन कार्ड हरवले तर एका भारतीय नागरिकांसाठी खूप समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपले पॅन कार्ड सांभाळून ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आता भारतीय नागरिक पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि या अर्जाद्वारे थेट ई-पॅन कार्ड डाउनलोड करून ते वापरू शकतात.
UTIITSL या अधिकृत वेबसाईट द्वारे नागरिक ई-पॅन (E-Pan Card) कार्ड डाउनलोड करू शकतात. या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही पॅन कार्ड अपडेट देखील करू शकता. यामध्ये तुम्ही मोबाईल, नंबर ईमेल आयडी इत्यादी गोष्टी बदलू शकता.
ई-पॅन कार्ड (E-Pan Card) डाउनलोड करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा
- पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम या https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html वेबसाईटला भेट द्या.
- होम पेज ओपन झाल्यानंतर पावती क्रमांक आणि पॅन नंबर क्रमांक या दोन पर्यायांपैकी पॅन नंबर पर्यावर क्लिक करून तुमचा 10 अंकी पॅन नंबर त्यामध्ये टाका.
- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक जन्मतारीख आणि उपलब्ध असलेला कॅपचा कोड टाकून Enter करा.
- सर्व सूचना वाचून झाल्यानंतर Accept बॉक्सवर क्लिक करून Submit करा.
- सबमिट केल्यानंतर तुमच्या ई पॅन कार्डची PDF फाईल स्क्रीनवर दिसू लागेल.
- 10 अंकी पॅन नंबर शिवाय तुम्ही अर्जासाठी पाठवलेला पोचपावती क्रमांक देखील वापरू शकता.
- तुमचा पोचपावती क्रमांक जन्मतारीख आणि उपलब्ध असलेल्या कॅपच्या कोड टाकून Submit बटणावर क्लिक करा.
- माहिती सबमिट होताच तुमच्या ई-पॅन कार्डची PDF तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- त्यानंतर ई पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी PDF Download या पर्यायावर क्लिक करा.
- या सर्व प्रक्रियेसाठीसाठी 8 ते 10 रुपये शुल्क आकारला जाऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadanvis | “मी तर फक्त ट्रेलर आहे, चित्रपट तर मुख्यमंत्री आल्यावर सुरु होतो”, देवेंद्र फडणवीसांची फटाकेबाजी
- Uddhav Thackeray | “उद्धवसाहेब काळजी नसावी…”; ‘या’ नेत्याचा उद्धव ठाकरेंना शब्द
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज संपणार, पीएम किसान योजनेचा 12 हफ्ता आज होणार जमा
- Narayan Rane | “विनायक राऊत यांना पाडण्यासाठी…”, शहाजीबापू पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नारायण राणेंची प्रतिक्रिया
- Shivsena । “गद्दारांनी बाळासाहेबांच्या फोटोशिवाय लढून दाखवावे”; ठाकरे गटाचा इशारा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.