Panda Mini EV | टाटा नॅनोपेक्षा छोटी कार लाँच, देईल ‘या’ गाडीला टक्कर

Panda Mini EV | टीम महाराष्ट्र देशा: दिवसेंदिवस बदलत्या टेक्नॉलॉजीमुळे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये अनेक नवीन गोष्टी बघायला मिळत आहे. अशात चिनी वाहन उत्पादन कंपनी Geely यांनी चीनमध्ये टाटा नॅनो (Tata Nano) पेक्षा लहान कार (Car) लाँच केली आहे. कंपनीने पांडा मिनी EV (Panda Mini EV) या नावाने ही छोटी इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. ही कार आकाराने खूपच लहान आहे. या नवीन इलेक्ट्रिक कारची लांबी फक्त 3065 मिमी आहे. या कारमध्ये एलएफपी बॅटरी पॅक उपलब्ध आहे.

पांडा मिनी इलेक्ट्रिक कारमध्ये 4 लोक बसू शकतात. या इलेक्ट्रिक कारमध्ये 30kw ची मोटार उपलब्ध आहे. ही मोटर एलएफपी बॅटरी पॅकला जोडली गेली आहे. तर, या बॅटरीच्या क्षमतेबद्दल अद्याप कंपनीकडून कुठली माहिती देण्यात आलेली नाही. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक कार पूर्ण चार्जमध्ये 150 किमी पर्यंत जाऊ शकते. या  कारला फक्त दोन दरवाजे दिलेले आहेत. तर, यामध्ये चार लोक बसू शकतात.

पांडा मिनी इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक आकर्षक वैशिष्ट्य आहे. यामध्ये सनरूफ, एसी विंग्स, मोठा इन्फोटेनमेंट स्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टिपल कंट्रोल स्विच इत्यादी वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

या गाडीची विक्री 2023 पासून सुरू होईल. तर, या गाडीची किंमत 10,000 युआन म्हणजेच सुमारे पाच लाख रुपयांपर्यंत आहे. पांडा मिनी इलेक्ट्रिक ही कार एमजीच्या एअर ईव्हीला टक्कर देऊ शकते. ही कार कंपनी पुढच्या वर्षी भारतात लाँच करू शकते. या कारमध्ये 17.3kWh आणि 26.7kWh असे दोन बॅटरी पॅक मिळू शकतात. हे बॅटरी पॅक चार्ज केल्याने अनुक्रमे 200 किमी आणि 300 किमी पर्यंत रेंज देण्यास सक्षम असू शकतात.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.