InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पानिपतची लढाई लवकरच.. आणखी एक पोस्टर लॉन्च

गेले काही दिवस सगळीकडे ‘पानिपत’ची चर्चा सुरू आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या दिग्दर्शनामुळे या चित्रपटाला विशेष महत्त्व आलंय. पानिपतमधील विविध भूमिकांचे पोस्टर्स आणि ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकणार अशी चर्चा होत आहे. यातच पानिपतचे आणखी एक पोस्टर आज लॉन्च झाले आहे.

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी आज पानिपतचे आणखी एक पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये मोठी तलवार दिसतीय. त्यावर मराठा व अब्दालीच्या सैन्यांची लढाई सुरू आहे. तर एका बाजूला सदाशिवरावभाऊ पेशवे (अर्जून कपूर) तर दुसऱ्या बाजूला अहमद शाह अब्दाली (संजय दत्त) दिसतोय. या फोटोला ‘सदाशिवराभाऊ व्हर्सेस अहमद शाह अब्दाली : 6 डिसेंबरला एका मोठ्या लढाईचे साक्षीदार व्हा!’ असे कॅप्शन दिले आहे.

Loading...

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.