Panjabrao Dakh Weather Report | ‘या’ जिल्ह्यांमध्ये येत्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज
Panjabrao Dakh Weather Report | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सातत्याने वातावरणात बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच कमाल तापमानात (Temperature) मोठा बदल झालेला दिसून आला आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवायला लागल्या आहे. अशा परिस्थितीत राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढच्या महिन्यामध्ये राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार (Panjabrao Dakh Weather Report), 5 मार्चपासून नंदुरबार धुळे, जळगाव, अहमदनगर, शिर्डी, नाशिक, माजलगाव, शिरूर या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतीतील रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांची लवकरात लवकर काढणी करून घेण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
त्याचबरोबर या कालावधीत पश्चिम विदर्भात आणि मराठवाड्यातील काही भागात देखील पाऊस पडण्याचा इशारा (Panjabrao Dakh Weather Report) देण्यात आला आहे. म्हणजेच एकंदरीत 5 ते 10 मार्च दरम्यान महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता डख यांनी वर्तवली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
या बदलत्या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस येण्याच्या आधीच शेतकऱ्यांनी शेतीतील उर्वरित कामे उरकून घ्यावीत असे आवाहन डख (Panjabrao Dakh Weather Report) यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी गहू हरभरा पिकांची लवकरात लवकर हार्वेस्टिंग करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, असे देखील डख यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- IND vs AUS | कर्णधार रोहित शर्मा ‘या’ खेळाडूला पुन्हा ठेवणार प्लेइंग-11 मधून बाहेर
- Job Opportunity | नागपूरमध्ये ‘या’ विभागात नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Bhaskar Jadhav | “नाना पाटेकरांनी सांगितल्यावर तुम्ही…”; फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भास्कर जाधवांचा पलटवार
- Sanjay Raut | “इतके घाणेरडी, दळभद्री मनोवृत्तीचे आमचे सहकारी होते”; राऊतांची शिंदे गटावर आगपाखड
- Girish Mahajan | “मला फसवण्याचा कट, माझ्या गाडीत गांजा”; महाजनांनी सांगितलं ‘ते’ पेनड्राईव्ह प्रकरण
Comments are closed.