Pankaja Munde | भाजपचा बॅनर, माजी नेत्यांना मानाचे पान पण पंकजा मुंडेंचा फोटोच गायब

Pankaja Munde | औरंगाबाद : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या पक्षात नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. बीडमध्ये देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे त्या भाजपात नाराज असल्याचे बोलले जात आहे.

आज औरंगाबादमध्ये फडणवीस यांच्या दौऱ्यात स्वागतासाठी लावण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये पंकजा मुंडे यांचा फोटो गायब आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. आजी-माजी नेत्यांचे फोटो बॅनरमध्ये होते. मात्र पंकजा मुंडे यांचे फोटो नसल्याचे चित्र औरंगाबादमध्ये पाहण्यास मिळाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्ताने औरंगाबादमध्ये ठिकठिकाणी भाजपाच्या वतिने बॅनर लावण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक असताना कार्यालय परिसरात हे बॅनर लावले आहे.

भाजपकडून पंकजा मुंडे यांना डावललं जात असल्याची चर्चाही औरंगाबादमध्ये होऊ लागली आहे. यावर आता पंकजा मुंडे काही भाष्य करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.