InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

धनंजय मुंडेंनी स्वतःच बीडमधील राष्ट्रवादी यशस्वीपणे संपवली – पंकजा मुंडे

धनंजय मुंडेंनी स्वतः काही कमावलेलं नाही. त्यामुळं राष्ट्रवादीच्या मतांचं श्रेय त्यांनी घेऊ नये. जिल्ह्यातील राष्ट्रवादी त्यांनी यशस्वीपणे स्वतःच संपवली आहे, असे म्हणत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.

एक्झिट पोलचे आकडे समाधान आणि आनंद देणारे आहेत. आम्ही अंदाज वर्तवले त्याहून चांगले अंदाज देशभरातले दिसत आहेत.असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, 2014 नंतर बीड जिल्ह्यात पक्षावर नसेल पण मुंडे साहेबांवर प्रेम करणारांनी त्यांना श्रद्धांजली म्हणून मतदान केलं. मात्र यावेळेला प्रीतमचं काम, माझी राजकीय शैली आणि संघर्ष या आधारावर होईल, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.