InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

बीडमध्ये मुंडे बहीण – भाऊ एकाच व्यासपीठावर…

भाजप नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे या बहीण भावातील वैर आपल्यासाठी काय नवीन नाही. सतत एकेमकांवर टीका करणारे हे दोघे बीडमधील परळीतल्या एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले अन् उपस्थितांना सुखद धक्का दिला.

परळीतल्या आबासाहेब वाघमारे यांच्या ‘अमृत महोत्सव’ निमित्त हे दोघे बहीण भाऊ एकाच व्यासपीठावर एकत्र आले. मात्र विशेष म्हणजे दोघांनीही एकमेकांवर बोलणे टाळले. त्या दोघांमधील व्यासपीठावरील अंतर सुरक्षित राहील, याची काळजी आयोजकांनी घेतल्याचं दिसून आले.

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.