InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

भाजपच्या पराभूत उमेदवारांची बैठक मात्र पंकजा मुंडे अनुपस्थित

- Advertisement -

विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक 105 जागा मिळवूनही भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदावरून घेतलेल्या आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शिवसेना भाजपचा वाद विकोपाला गेला.

कोणताही पक्ष सत्ता स्थापन न करु शकल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागली आहे. त्यानंतर आता भाजपकडून तीन दिवसांच्या बैठकांचे आयोजन केलेलं आहे. मुंबईतील दादर इथल्या मुंबई भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात या बैठका होत आहे. आज भाजपच्या पराभूत उमेदवारांची बैठक होत आहे. मात्र या बैठकीला पंकजा मुंडे अद्याप अनुपस्थित आहे.

Loading...

- Advertisement -

भारतीय जनता पक्ष आज विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक घेत आहे. दादरच्या वसंत स्मुर्ती कार्यालयात या बैठीकचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे हे उपस्थित होते.

Loading...

तर पराभूत झालेल्या उमेदवारात रोहिनी खडसे, हर्षवर्धन पाटील, राम शिंदे, माजी मंत्री अनिल बोंडे, राम शिंदे, राजकुमार बडोले, वैभव पिचड सह इतर उमेदवार उपस्थित होते. या बैठकीला सुरवात झाली असली तरी अद्याप विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे गैर हजर आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

1 Comment
  1. बबन बारगजे says

    एखादा उमेदवार गैरहजर राहू शकतो कारण त्यांचेही काही वैयक्तिक काम असू शकते त्यासाठी एवढा गाजावाजा करायची काही आवश्यकता नाही

  2. Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.